मंगळवार, सप्टेंबर 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

साताऱ्यामध्ये ४८९ कुटुंबांचे स्थलांतर… अशी आहे पूरस्थिती

by Gautam Sancheti
जुलै 23, 2023 | 5:24 am
in राष्ट्रीय
0
EepO4FGX0AAvkOt

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातारा जिल्ह्याला देण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सर्व प्रशासकीय यंत्रनेकडून जिल्ह्यातील परिस्थतीचा आढावा घेतला. निवारा शेडमध्ये असणा-या नागरिकांना अन्न , शुध्द पिण्याचे पाणी, औषधे आदी सर्व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी जमिन उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गाचा अवलंब करावा. रात्री अपरात्री लोंकाना औषध उपचारासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये 24×7 प्राथमिक आरोग्य केंद्रे उपलब्ध राहतील याची आरोग्य यंत्रणेने सर्वोतोपरी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्हृयाकडे लक्ष असून पावसाळी स्थितीत आवश्यक त्या सर्व उपाय योजनांसाठी निधी कमी पडु देणार नसल्याची त्यांनी ग्वाही दिल्याचे सांगितले. पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे जिल्हयातील स्थितीचा आढावा प्रशासकीय यंत्रणेकडुन घेतला. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी ,यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, पावसाळी परिस्थीतीत पाणी तुंबू नये यासाठी सक्तीने नाले सफाई करावी. फॉगींग करावे, नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी अधिकचे मनुष्यबळ वापरुन लवकरात लवकर विद्युत प्रवाह सुरळित करण्यात यावा. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी दारु पिऊन हुल्लडबाजीचे प्रमाण वाढले आहे. धोकादायकपणे पर्यटकांनी पाण्यात जाऊ नये यासाठी वनविभाग पोलीस व उत्पादनशुल्क यांनी संयुक्तपणे नियमन करावे असेही निर्देश त्यांनी दिले.

खा.श्रीनिवास पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील पुर्नवसनाच्या कार्यक्रमाची गतीने अमलबजावणी व्हावी यासाठी दरमहा बैठक घेऊन आढावा घेण्यात यावा. पावसाळ्यातील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी नियोजन करण्यात यावे, असे सांगुन सातारा जिल्ह्यासाठी लवकरच जवळपास 2 कोटी रु किमतीची सुस्सज्ज व अद्ययावत ॲम्ब्युलन्स केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कराड येथे विमानाची धावपट्टी मोठी करण्यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी आढावा देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, कोयना धरण 43.14 टिएमसी भरले असून जिल्ह्यातील सर्व धरणातील एकूण पाणीसाठा टक्केवारी 44.27 टक्के आहे. सद्यस्थितीत धोम-बलकवडी धरण क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने आज सांयकाळ पासून दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सातारा -कास- बामनोली रस्त्यावर सांबरवाडी या ठिकाणी धोकादायक स्थितीतील दगड काढण्यासाठी सोमवारी बोगद्यापासून ते कासला जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणी आवश्यकत्या उपाययोजना तात्काळ राबवून सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात तात्पुरते 47 निवारा शेड बांधण्यात आले असून सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथील 18, सांडवली येथील 20, भैरवगड येथील 60, जावळी तालुक्यातील बोंडारवाडी येथील 6, भूतेर येथील 3, वहीटे येथील 3, वाटंबे येथील 2, वाई तालुक्यातील जोर येथील 8, गोळेगाव-गोळेवस्ती येथील 4, पाटण तालुक्यातील मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील 150, गुंजाळी येथील 6, म्हारवंड येथील 56, जोतिबाची वाडी येथील 5, सवारवाडी येथील 18, पाबळवाडी येथील 4, बोंगेवाडी येथील 14, केंजळवाडी येथील 21, कळंबे येथील 4, जिमनवाडी येथील 22, तर महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे,चतुरबेट, मालुसर, एरणे येथील 65 अशा एकूण 489 कुटुंबाचे तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे. या नागरिकांना अन्न, शुध्द पेय जल व अन्य अनुषंगिक सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती ही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.

तसेच धोकादायक गावातील नागरिकांना संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यामार्फत सुरक्षित ठिकाणी अथवा नातेवाईकांकडे स्थलांतरीत होण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे. दरड प्रवण गावांकरीता संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नदीकाठची संभाव्य पूरप्रवण गावे, संभाव्य दरड प्रवण गावे अशा 96 गांवाचे जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुणे यांच्यामार्फत फेरसर्वे करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी जिल्हा परिषदेची सर्व यत्रंणा, आरोग्य पथके प्रत्यक्ष कार्यस्थळावर आहेत. कामकाज सुरळीतपणे चालु आहे, असे सांगितले. यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी दरड कोसळणे अथवा भूस्खलनासारखे प्रकार साधारणपणे रात्रीच्या वेळी होत असल्याने संवेदनशील ठिकाणी रात्रीच्या पोलीसांच्या गस्ती वाढविण्यात आल्याचे सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यात अशी आहे स्थिती… युवक वाहून गेला… हे रस्ते बंद…

Next Post

नांदेड जिल्ह्यासाठी असा आहे पावसाचा इशारा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Saurrath २०२५ 2
संमिश्र वार्ता

नाशिक परिमंडळात २५ हजार ग्राहकांनी बसविली ५८ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा….सौर प्रचार रथाला प्रारंभ

सप्टेंबर 23, 2025
crime 13
आत्महत्या

इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत ३३ वर्षीय युवकाने केली आत्महत्या

सप्टेंबर 23, 2025
Screenshot 20250729 142942 Google
इतर

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 23, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती, आजच्या कॅबिनेट बैठकीत हेक्टरी ५० हजार मदत जाहीर करा….रोहित पवार

सप्टेंबर 23, 2025
cbi
संमिश्र वार्ता

CBI ने ३.८१ कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित फरार आरोपीला केली अटक

सप्टेंबर 23, 2025
WhatsAppImage2025 09 22at6.33.17PM7UK9
संमिश्र वार्ता

धाराशिव जिल्ह्यातील लाखी गावात तातडीने हेलिकॉप्टरद्वारे बचाव अभियान

सप्टेंबर 23, 2025
3 ASHISH SHELAR 2
संमिश्र वार्ता

आता लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात होणार बदल…सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 23, 2025
AHILYANAGAR NEWS 3 scaled 1 e1758591204124
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका…प्रशासनाचे तत्पर मदतकार्य

सप्टेंबर 23, 2025
Next Post
maharashtra rainfall e1690042246553

नांदेड जिल्ह्यासाठी असा आहे पावसाचा इशारा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011