सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भ्रष्टाचार हा जणू काही शिष्टाचार बनला आहे, कारण अनेक शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत लाच घेतली जाते, अर्थात याला काही जण अपवाद असले तरी पुर्वी चोरीछुपे लाच घेतली जात असे, आता उघडपणे लाच स्विकारली जाते. पोलीस खाते तर त्यामुळे बदनाम झाले आहे, पोलीस लाच खातात, असा सर्वत्र समज झाला असून असे प्रकार वारंवार घडत असल्याने त्याला पुष्टी मिळते, सातारा जिल्ह्यात पोलीस खात्यात असाच गैरप्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अवैध दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात सहकार्य करण्यासाठी १ लाख रुपयाची लाच घेताना दोन पोलिस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले असून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
अवैध दारू व्यवसाय प्रकरण
औंध पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक उपनिरिक्षक बापूसाहेब जाधव या दोन्ही लालची अधिकाऱ्यांनी अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात मदत करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोड करून एक लाखाची लाच देण्याचे ठरले होते, मात्र त्याच वेळी तक्रारदाराने या दोघा लालची लाचखोरांना जाळ्यात अडविण्याला ‘गेम’ केला. गुपचुप ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करुन याची तक्रार केली आणि लाचलुचपत विभागाने या दोघांनाही रंगेहात पकडले. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आणखी कोणी पोलीस अधिकारी लाचखोर आहेत का? याची देखील चर्चा सुरू आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
खरे म्हणजे तक्रारदाराच्या परमिट रुममधून दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे औंध पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराला मदत करण्याच्या हेतूने आणि त्याला यापुढे त्याच्या व्यवसायात या पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी या पोलिसांनी त्याच्याकडून दीड लाखाची लाच मागितली. तसेच यापुढे तुला कोणी त्रास देणार नाही आम्ही याचे काळजी घेऊ, असे देखील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्यावर या तक्रार तथा बारमालकाने विश्वास ठेवला. त्यानंतर एक लाखावर तडजोड करण्यात आली. मात्र तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक उज्वल अरुण वैद्य यांच्या टीमने सापळा रचत दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले. या दोन्ही पोलिसांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडीओला लाच घेताना अटक
केवळ सातारा नव्हे तर नाशिक, जळगाव, बीड, अमरावती या शहरांनी जणू काही लाचखोरी लागण झाली आहे. कारण दुसऱ्या एका घटनेत यवतमाळच्या पांढरकवडा पंचायत समितीचा बीडीओ विठ्ठल शामराव जाधव याला २२ हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही सापळा कारवाई केली. एका गावातील शेतकऱ्यांच्या चार सिंचन विहिरींच्या बिलावर सही करण्यासाठी लाचेची मागणी बीडीओने पडताळणी दरम्यान केली होती. त्यानंतर त्याला रंगेहात अटक करण्यात आली होती.
Two police officers caught red-handed while accepting a bribe of Rs. Satara Bribe Corruption Crime Police Officers ACB Trap