सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील करंजाडी परिसरात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कांदा, डाळींब पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.
करंजाडी परिसरातील करंजाड, भडाणे, बिजोटे, आखतवाडे, निताणे, पारनेर, आनंदपुर, गोराणे आदि भागात तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारा व गारपीटीने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे बिजोटेतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मोठे नुकसान झाले असून दुकान, किशोर बच्छाव यांचे हाॅटेल वैष्णवी, घरांचे पत्रे वादळात उडाले.
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले असून बहुतांश भागात कांदा उत्पादक शेतातील कांदा काढणीत व्यस्त असतांनाच वीजेचा कडकडाटात, वादळ, अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले यामुळे शेतातील संपूर्ण कांदा भिजून पडला असून रस्त्यावर गारांचा खच दिसून येत आहेत. आखतवाडे, पारनेर, निताणे, भडाणे, या गावातही मोठ्या प्रमाणात घरांचे तसेच शेतीशिवारात कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. शासकीय नुकसानग्रस्त भागात आमदार दिलीप बोरसे पाहणी करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
Katnjad,tal satana baglan,dist nashik
Hailstorm reported pic.twitter.com/QO1K5Xn0q2— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 8, 2023
Satana Unseasonal Rainfall Hailstorm