नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण सायकलिस्ट असोशियेशन तर्फे दिवाळीच्या निमित्ताने सटाणा ते श्री क्षेत्र नस्तनपुर अशी १८० किलो मीटरची सायकल फेरी काढण्यात आली..या सायकल फेरीत लहान मुले, महीलांसह ३१ जणांनी सहभाग घेतला.पर्यावरणाचे रक्षण व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश या सायकल फेरीतून संदेश देण्यात आला श्री.क्षेत्र नस्तनपुर येथे या सर्व सायकल स्वारांचा सत्कार करण्यात आला..