नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथील सप्तशृंगी पतसंस्थेच्या थकीत कर्जाची रक्कम न भरल्या प्रकरणी आरपीआयच्या माजी तालुकाध्यक्षला जायखेडा पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री घरातून अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या समन्सला तो गुंगारा देत होता. तसेच, बँक,पतसंस्था यांचे कर्ज बुडवू पाहणाऱ्यांचे यानिमित्ताने चांगलेच धाबे दणाणले आहेत.
सटाणा तालुका आरपीआयचे माजी अध्यक्ष योगेश्वर (कैलास) मोरे यांचे विरूध्द कर्जवसुली प्रकरणी ताहाराबाद येथील सप्तशृंगी पतसंस्थेच्या वतीने न्यायलायात दावा दाखल केला होता. याबाबत न्यायालयाने वेळोवेळी समन्स देवूनही गुंगारा देणाऱ्या मोरे यांचे विरूध्द अजमीन पात्र अटक वॉरंट काढल्याने जायखेडा पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मोरे यांना घरातून अटक करून दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर हजर केले. दरम्यान यामुळे बँक पतसंस्थांकडून कर्ज घेऊन परतफेड करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी याकामी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करून वरील कार्यवाही घडवून आणली.
Satana Taluka Political Leader Arrest Loan Defaulter