निलेश गौतम, सटाणा
सरकारी काम सहा महिने थांब या वाकप्रचाराला बागलाण तहसीलदार कार्यालयाने काही अंशी छेद देत. आपल्या कार्यपद्धतीत बदल केल्याचे गत काही दिवसात दिसून आले आहे. बागलाणच्या तहसीलदारपदी साडेतीन वर्षे पूर्वी आलेले युवा तहसीलदार जितेंद्र इंगळे – पाटील यांनी गत काळात तहसीलची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
देवमामलेदारांच्या बागलाण तालुक्यात आजवर अनेक अधिकारी आले आणि गेले जो तो आपल्या कार्यकर्तृत्वाने जनतेची मने जिंकून गेले तर याच सत्यायन नगरीत अनेकांना बदनामीचे धनी ही व्हाव्हे लागले आहे .बागलाणच्या तहसीलदार पदाचा काटेरी मुकुट सांभाळताना येथील जनतेला देवमामलेदारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कामकाज करावे लागते. हे कौशल्य आज तागायत सर्वानाच जमलेच असे कधी झाले नाही तत्कालीन तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांची बदली झाल्यानंतर तालुक्याला त्यांच्या सारखा कामकाज व सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा अधिकारी लाभावा अशी जनभावना असताना तालुक्यात वादग्रस्त अधिकारीची नेमणुक झाल्याने काही काळ बागलाण तहसिलदार कार्यालयाला अवकळा आल्याचे चित्र दिसुन येत होते.
तत्कालीन आमदारांनी या अधिकाऱ्यांच्या विरोधात नागपुर हिवाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव सादर केल्याने या अधिकाऱ्याची तात्काळ बदली झाली मधल्या काळात प्रभारी अधिकारी येऊन कामकाज जरी पाहू लागले तरी तालुक्याला पूर्णवेळ तहसीलदार हवे होते यातच मितभाषी असलेले प्रमोद हिले यांनी तहसीलदार म्हणून कामकाजाला सुरवात केली मात्र त्यांच्या अचानक बदलीने तालुक्यातील तहसील कार्यालयाचे कामकाज एका चाणाक्ष व कर्तव्य दक्ष अधिकारी शिवाय चालणे शक्य नव्हते.
या काळात तहसीलच्या कामकाजबद्दल अनेकांच्या तक्रारी होत असल्या तरी जो पर्यंत कडक शिस्तीचा अधिकारी तहसीलादर म्हणून येत नाही तो पर्यंत या कार्यालयात सुधारणा दिसून येणार नाही हे सर्वसृत असताना 2019 मध्ये बागलाण तहसील कार्यालयाची जबाबदारी युवा तहसीलादर जितेंद्र इंगळे पाटील यांच्या कडे आली अर्थात बागलाण ला अनुभवी आणि कामकाजचा दिर्घ अनुभव असला तरच काम करणे शक्य आहे हे महसूल च्या वरिष्ठांना माहीत असताना अनुभवाची शिदोरी कमी असलेल्या इंगळे पाटलांना थेट बागलांची सुबेदारी देण्यात आली तहसीलादर म्हणून आलेले जितेंद्र इंगळे यांनी ही सुरवातीच्या वर्ष भर तालुक्यातील एजंट, दलाल, व अन्य तहसीलशी हितसंबंध ठेवणाऱ्या ना दोन हात दूरच ठेवले.
या वर्षभरात तहसीलच्या इतर सर्वच विभागांना वेळोवेळी सूचना देत प्रसंगी खाते अंतर्गत बदल करून तहसील ची डागाळलेली प्रतिमा क्लीन करण्याचा प्रयत्न केला याच काळात देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना तालुक्याचे प्रमुख म्हणुन कोरोना काळात कायदा सुव्यवस्थेसह आरोग्य यंत्रणे बरोबर कामकाज करीत इंगळे पाटील यांना तालुक्यातील जनतेची आरोग्याची काळजीही घ्यावी लागली या काळात त्यांना ही कोरोना शी दोन हात करावे लागले हे नाकारता येणार नाही मात्र अनुभव कमी मात्र तहसीलच्या कामकाजात सुधारणा होत जनता आपल्यावर विश्वास ठेवून आपण घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करीत आहे. हे लक्ष्यात आल्यावर इंगळे पाटील यांनी कोरोना संपल्यानंतर तहसीलशी संबंधित जनतेची थांबलेली कामे करण्याचा जो प्रयत्न गत दोन वर्ष्यात केला त्यामुळे तालुक्याचे अर्धन्यायिक स्वरूपाचे न्यायालय म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्याची प्रतिमा सर्वसामान्य जनतेत उजाळलेली दिसते आहे.
तहसीलच्या गत तीन वर्ष्याच्या कामकाजाचा आढावा घेतला असता शेती समृद्ध बागलाण तालुक्यात सर्वाधिक वाद व तंटे हे शेतजमीन रस्ता वहिवाटीचे असतात. अत्यंत गुंतागुंतीची क्लिष्ट असणारी ही प्रकरणे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी आपल्या कौशल्याने सोडवली आहेत. प्रत्यक्ष स्थळ पाहणी करीत शेत तिथे रस्ता या शासनाच्या धोरणानुसार अनेक प्रकरणे दोन्ही बाजूच्या सामंजस्याने मिटवली आहेत. कलम 5 व कलम 143 नुसार 2022-2023 या वर्षाअखेर सुमारे 42 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
एकूण साडेतीन वर्षाच्या कालावधीत अश्या प्रकरणांची संख्या ही 862 आहे. इंदिरा गांधी व संजय गांधी योजनेतून 3 वर्षात सुमारे 3683 लाभार्थ्याना अनुदानाचा लाभ तहसील कार्यालयातर्फे देण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा असणारा शिधापत्रिकेचा प्रश्न निकाली निघाला आहे. मार्च अखेर आलेल्या सर्वच अर्जावर निर्णय घेऊन 1700 शिधापत्रिका वर्षभरात वाटप करीत सर्वसामान्य जनतेचे तहसील कार्यालयात होणारी ससेहोलपट थांबली आहे.
शिधा पत्रिकेबाबत असलेली एजंट साखळी रोखून सरळ अर्ज स्वीकारत अनेक वंचित कुटुंबियांना शिधापत्रिका देण्यात बागलाण महसुल विभागाला यश आले आहे. तीन वर्षाच्या कालावधीत 10 हजार 14 शिधापत्रिका वाटप करीत तालुक्यातील गोरगरीब जनतेला दिलासा दिला आहे. कुळकायदा प्रकारणात तीन वर्षात 32 ग, 10 अ व अन्य प्रकरणामध्ये निकाल देत सुमारे 40 प्रकरणे मार्गी लावली आहेत.तालुक्यातील अवैधरित्या होणारे गौण खनिज उत्खनन बंद करीत वाळू माफियांच्या मुसक्या आवळत कोट्यवधींचा महसुल गोळा करीत बागलाण तहसील जिल्ह्यात अव्वलस्थानी राहिले आहे.
Satana Tahsil Office Work Improvement and Fast