सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवैधरीत्या वाळु वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व बैलगाडे यांच्यावर सटाणा पोलीसांनी मध्यरात्री कारवाई करत पाच लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
वाळू माफियांबरोबरच गुटखा माफियांवर कारवाई करत चाळीस हजार रुपये किमतीचे अवैध रित्या विकले जाणारे गुटखा जप्त करून आरोपी फिरोज मुक्तार तांबोळी रा.सटाणा यांच्या विरोधात सटाणा पोलीसांत गुन्हा दाखल झाला असुन आरोपीला कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, हवालदार जिभाऊ पवार, पोलीस नाईक अजय महाजन, सविता कावळे, गोपनीय शाखेचे अशोक चौरे, हरि शिंदे, सागर बनुसकर, विलास मोरे यांच्या पथकाने केली.
Satana Police Crime Illegal Sand Transport Tractor Seized