डांगसौंदाणे – बागलाण तालुक्यात राजकीय पदाधीकारीसह कार्यकर्त्यांमध्ये सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणांची रचना ही चुकीच्या पद्धतीने झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी बैठका व वरिष्ठ अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन राजकीय पदाधिकारी यांच्याकडून केले जात आहे.
याबाबत राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांचे आदेशा नुसार अत्यंत गोपनीय पद्धतीने व कुठलाही राजकीय हस्तक्षेपास बळी न पडता तयार केलेला तालुक्याचा प्रारूप आराखडा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र सध्या तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारे गटांच्या निर्मितीची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कुठलाही गट -गण रचनेचा आराखडा जाहीर झालेला नसतांना त्यावर जाहीर चर्चा करणे हे अत्यंत चुकीचे कृत्य आहे. याबाबत कोणी अफवा पसरवत असेल तर ती व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र ठरू शकतो. गट- गण प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांचेपैकी कोणाला ही सक्षम प्राधिकारी यांचे कडे आक्षेप नोंदविता येणार आहे. याबाबत कुठलीही तारीख निश्चित झालेली नसून सर्वाना याबाबत संधी दिली जाणार असल्याने गट गण रचनेबाबत कोणत्याही अफवाना बळी पडू नये असे आवाहन तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी केले आहे.