डांगसौंदाणे – कंधाणे ता बागलाण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९७२ साली बांधण्यात आलेला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ जीर्ण झाला असुन जुन्या झालेल्या बांधकामामुळे या जलकुंभाचा स्लॅब ठिकठिकाणी कोसळत असुन जलकुंभाला ब-याच ठिकाणी भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. पडलेल्या भगदाडानमुळे जलकुंभाची अनेक दिवसापासून साफ-सफाई झाली नसल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जलकुंभाच्या ठिकाणी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलकुंभ मंजूर करण्यात यावा यासाठी स्थानिक प्रशासना कडून लोकप्रतिनिधी व सरकार दरबारी अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे. पण याकडे संबधितांना कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कंधाणे वासीयांचा आरोग्य सह पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे .
पूर्वी कंधाणे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरम नदीच्या पाण्याचा वापर करावा लागत होता. वापरत असलेल्या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना अनेक साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत होते. गावातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तत्कालीन स्थानिक प्रशासनाने १९७२ साली गावात पाणीपुरवठा योजना राबवुन या जलकुंभाची निर्मिती केली आहे त्यावेळी या जलकुंभा द्वारे संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. तेव्हा पासून तर आजमितीस निम्मा गावाचा पाणीपुरवठा हया जलकुंभा द्वारे करण्यात येत आहे. बांधकामाला ब-याच वर्षाचा कालावधी लोटल्याने या जलकुंभाच्या वरच्या ठिकाणाचा स्लॅब ब-याच ठिकाणी कोसळून मोठ मोठी भगदाड पडली आहेत. या भगदाडातून अनेक पशू पक्षी या पाण्यात पडत असून पाण्यातच सडत आहेत. वरचा भाग पुर्णता धोकादायक बनल्याने या जलकुंभाची स्वच्छता करणे पाणीपुरवठा कर्मचारी वर्गाच्या जीवावर बेतू शकत असल्याने त्याने सदर जलकुंभाची अंतर्गत स्वच्छता करणे ब-याच महिण्यान पासून बंद केली आहे.
जलकुंभाचे बांधकाम जून्या राहटीचे असल्याने जलकुंभावर वरती चढण्यास कोणीही सुविधा नसल्याने या टाकीच्या पाण्याच्या आत दडलय काय ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. जलकुंभाची स्वच्छता होत नसल्याने अनेक वेळा नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे कर्णापोकर्णि चर्चा आहे. याबरोबरच जलकुंभाल बाहेरूनही अनेक ठिकाणी मोठमोठी भगदाड पडत असुन साठवलेल्या पाण्याला गळती लागली आहे. या पाणीपुरवठा जलकुंभ परिसरात नागरिक वस्ती असून लहान लहान बालके या ठिकाणी खेळत असतात त्याचबरोबर जवळच प्राथमिक शाळा असल्याने बरेच विद्यार्थी या जलकुंभ परिसरातून जा ये करत असतात जलकुंभाच्या जीर्णत्वा मुळे हा जलकुंभ केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. या जलकुंभाच्या ठिकाणी नवीन जलकुंभ मंजूर करावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीन कडे अनेक वेळा आर्जव केली. पण निवडणूकीत मताचा जोगवा मागण्या पुरते दिसणा-या प्रतिनिधिनी कडून याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने येथील नागरिकांना आजही या नवीन जलकुंभाची प्रतिक्षा लागून राहिलेली आहे. सरकारी यंत्रणेलाही या बाबतची कथा अनेक वेळेला कथन केली गेली आहे. पण सरकारी काम बारा महीने थांबचा प्रत्यय येथील नागरिकांना येत आहे. या नवीन जलकुंभाचा प्रश्न दरवेळेस लोकसभा व विधानसभा निवडणूकीत चर्चिला जातो निवडणूक संपली का संबधित लोकप्रतिनिधी व नागरिकांना ही याचा विसर पडतो. एखादी अघटित घटना घडण्या आधी या जलकुंभाच्या ठिकाणी नवीन जलकुंभ मंजूर होईल का अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांना आहे.
…..
नवीन जलकुंभाची निर्मिती व्हावी
गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेला हा जलकुंभ जीर्ण झाला असुन त्याच्या जीर्णत्वा मुळे ब-याच ठिकाणी त्याला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे याच्यातून ब-याच ठिकाणाहून सतत पाणी झिरपत आहे आधिच पाणीटंचाईमुळे गावाला एका दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असुन त्यातच होणा-या या पाणी लिकेच मुळे अजून कमी पाणीपुरवठा नागरिकांना होत आहे जुन्या झालेल्या या जलकुंभामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे तरी लवकरत लवकर नवीन जलकुंभाची निर्मिती व्हावी
शशीकांत बिरारी, माजी उपसरपंच, कंधाणे
…..
अंतर्गत साफ-सफाई करण्यास अडचणी
नवीन जलकुंभाचा प्रस्तावा पंचायत समिति कडे पाठवला असुन सर्व परिस्थितिचे अवलोकन ही संबधितांना कथन केले गेले आहे पण अदयाप पावत कोणाताही मंजूर आदेश आम्हांला प्राप्त नाही जीर्ण बांधकामामुळे या जलकुंभाची अंतर्गत साफ-सफाई करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सतीश मोरे, ग्रामसेवक, कंधाणे