नाशिक – सटाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयात मुख्यालय सहाय्यक सुनील मोरे यांना दोन हजाराची लाच घेतांना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
सटाणा तालुक्यातील पारनेर येथील शेतगट क्रमांक ६०/४ चे मोजणीच्या कामात मदत करुन त्याची अॅानलाईन नोंद करुन नोटीसा लवकर काढण्यासाठी मोरे यांनी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर फिर्यादी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंध विभागाने पडताळणी करुन सापळा लावला. त्यात मोरे हे लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले गेले. या गुन्ह्याची माहिती पोलसीस उपअधीक्षक सतीश भामरे यांनी दिली.