डांगसौंदाणे– येथील श्रीराम मंदिर सभागृहात आज बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान सोहळा व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. संजय चव्हाण हे उपस्थितीत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण तालुका पक्ष निरीक्षक सुनील आहेर,तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी,जिल्हा उपाध्यक्ष चारुदत्त खैरनार,गणेश पवार, किरण पाटील ,जिल्हा सरचिटणीस बापू जगताप,तालुका कार्यध्यक्ष केवळ देवरे,शहर अध्यक्ष सुमित वाघ, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुयोग आहिरे,जिल्हा सरचिटणीस संदीप आहीरे,युवक तालुकाध्यक्ष सम्राट काकडे,शहर अध्यक्ष सागर वाघ, अनिल चव्हाण,नितीन काकडे,किरण पाटील ,शशी कोर , महेश शेवाळे,आदि मान्यवर उपस्थित होते. ..
कार्यक्रमात माजी आ.संजय चव्हाण,शैलेश सूर्यवंशी, ग्रामीण रुग्ण्णा्णायाचे वैद्ययकिय अधिकारी डॉ. मोरे याांनी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे व रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर सर्व आरोग्य्य कर्मचारी, ग्रामपंचायतचे सफाई व इतर सर्व कर्मचारी यानाा कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. तर केदा मोरे यांचे कुटुंब कोरोनामधून बरे झाले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. .याप्रसंगी विभाग निहायपद नियुक्त्या करण्यात आल्या.या वेळी माजी आमदार संजय चव्हाण यांनी बोलताना सांगितले की पक्षाच्या ध्येय धोरणानुसार तालुक्यात पक्ष वाढीसाठी गावोगावी तरुणांची फळी उभी केली जात असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत बागलांणमध्ये पक्षाची मोठी ताकद उभी करून मोठ्या प्रमाणावर आपले प्रतिनिधी निवडून आणायचे आहेत. यासाठी गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न सोडविण्यास सर्वप्रथम आपल्याला प्राधान्य द्यायचे आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून जिल्हा बँकेने शेतकऱ्याकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा पोलिस प्रमुखाना सक्त सूचना केल्या असून जिल्हा बँकेला कर्ज वसुली साठी कुठल्या ही प्रकारे पोलीस बंदोबस्त देऊ नये व शेतकऱ्यांना जर जिल्हा बँक वेठीस धरण्याचा प्रकार करीत असेल तर तात्काळ तक्रार आमच्याकडे करावी अशा सूचना युवक कार्यकर्त्यांना चव्हाण यांनी दिल्या. तरुण पदाधिकाऱ्यांना निवडीची जबाबदारी व काम करण्याच्या सूचना देत शुभेच्छा दिल्या. या नवीन नियुक्त पदाधिकारींमध्ये पठावे दिगर गट अध्यक्षपदी दिनेश गांगुर्डे तसेच डांगसौंदाणे शहराध्यक्षपदी निखिल सोनवणे डांगसौंदाणे शहर उपाध्यक्षपदी गौरव बोरसे पठावे दिगर गण अध्यक्ष गणेश सोनवणे, विद्यार्थी काँग्रेस शहर उपाध्यक्ष दिप देसले ,अतुल सोनवणे तालुका कार्याध्यक्ष असे देण्यात आले. कार्यक्रमाला कैलास बोरसे,निवृत्ती सोनवणे, साहेबराव काकुळते,निलेश गौतम,हिरालाल बाविस्कर, रवींद्र सोनवणे रमेश बोरसे हितेश लाडे आदि उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा उपाध्यक्ष चेतन सोनवणे व तालुका सरचिटणीस सौरभ काकुळते यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागलाण तालुका रा.यू काँ.चे विधानसभा उपाध्यक्ष चेतन सोनवणे तर सूत्रसंचालन भूषण बोरसे यांनी केले . कार्यक्रमाचे आभार तालुका सरचिटणीस सौरभ काकुळते यांनी मानले.