डांगसौंदणे- जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून बांधण्यात आलेल्या ७५ हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण आज बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. तर डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कोरोना योध्दा सन्मान सोहळा श्रीराम मंदीर सभागृहात पार पडला. कार्यक्रमास उपस्थित आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते ग्रामपंचयातीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केलेल्या सर्व कोरोना योद्धाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच जिजाबाई पवार या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील ,माजी जि .प. सदस्य प्रशांत बच्छाव, बाजार समितीचे मा.सभापती संजय सोनवणे, शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा ,विस्तार अधिकरी नितीन देशमुख उपस्थित होते. कोरोणा काळात विविध माध्यमातून समाजसेवा करणारे आरोग्यदूत, पोलीस, महसुल,पत्रकार, आरोग्य सेविका, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक ,स्वछता कर्मचारी आदींचा कोरोना योद्धा म्हणून डांगसौंदाणे ग्रामपंचायतीचया वतीने सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमास आमदार दिलीप बोरसे यांनी संबोधित करीत चांगल्या कामाची दखल ही घेतलीच पाहिजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामाची पावती ही ग्रामपंचायत डांगसौंदाणेने दिली आहे या पुढील काळात ही या योध्यानी समाजहितासाठी प्रामाणिक काम करण्याची अपेक्ष्या व्यक्त केली कोव्हिडं काळात डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यासाठी सर्वात मोठे आधार ठरले सुरवातीला आदिवासी भाग म्हणुन विरोध झाला मात्र आज या कोव्हिडं सेंटर मध्ये अनेकांना जीवदान मिळाले याचे सर्व श्रेय तेथे काम करणाऱ्या डॉक्टर, व आरोग्य कर्मचारींना जाते आज या सर्व जणांचा सन्मान करतांना नक्कीच आनंद होत असल्याचे गौरवोद्गार आमदार बोरसे यांनी काढले . या वेळी कोरोना योद्धा म्हणुन डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालय सर्व कर्मचारी, डॉ जगदीश चौरे, पो.हवा. प्रकाश जाधव, जगजितसिंह सोळंकी, निवृत्ती भोये, जेष्ठ पत्रकार हेमंत चंद्रात्रे, पत्रकार निलेश गौतम, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक डॉ प्रदीप खैरनार, डॉ राहुल गायकवाड, तलाठी आतिष कापडणीस, हिरालाल बाविस्कर, संतोष दुसाने, विशाल नेरकर सुनील वाघ, आरोग्य सेविका अलका आहेर, हर्षद सोनवणे,आदींचा कोरोना योद्धा म्हणून आमदार बोरसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत डांगसौंदाणेच्या वतीने करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करीत या पुढील काळात ही डांगसौंदाणे गावाच्या विकासकामासाठी आमदार मोहदयानी मदत करण्याची मागणीं करीत कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल गावाच्या वतीने आभार मानले. या वेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, तंटा मुक्त अध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे, डॉ सुधीर सोनवणे ,पंकज बधान, सोपान सोनवणे, बुंधाटे सरपंच नंदू बैरागी, रवींद्र सोनवणे, कडु सोनवणे, राजेंद्र परदेशी, जगदीश बोरसे, महेश सोनवणे, मंगेश बोरसे, महेंद्र सोनवणे,निवृत्ती सोनवणे, कैलास बोरसे, मनोहर सोनवणे धनंजय देशमुख ग्रामसेवक सचिन सूर्यवंशी ,प्रशांत आंबेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निवृत्त मुख्यध्यापक पंढरीनाथ बोरसे यांनी केले.