इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सटाणा येथे ताहराबाद वनक्षेत्राच्या कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून वनमजूराने स्वत.ला फेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेत वनमजूर ८० टक्के भाजल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, वनमजूर राजेंद्र साळुंखे हे गेल्या २० ते २५ वर्षापासून वनविभागात कार्यरत होते. मात्र त्यांना कायमस्वरुपी कामगार म्हणून घेण्यात आलेले नव्हते. त्यामुळे वनमजुराने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी अंगावर डिझेल घेत पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान वनपाल सागर पाटील यांच्याकडून वन मजुरांपेक्षा कमी वेतन त्यांना दिले जायचे असा आरोप निकटवर्तीयांकडून करण्यात आला आहे.