डांगसौंदाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लाड शाखीय वाणी समाज कर्तृत्व, आणि दातृत्वाने मोठा असुन आपल्या व्यवसायातील प्रामाणिकता,सामाजीक बांधिलकी,जपणे हीच खरी समाजाची ओळख असुन येणाऱ्या काळात समाजविकसासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले ते डांगसौंदाणे येथे समाजाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल चिंचोरे हे होते.
येथील लाडशाखीय वाणी समाजमंगल कार्यलयाच्या प्रगणात समाजाच्या वतीने आमदार दिलीप बोरसे यांचा नागरी सन्मान नूतन पदाधिकारी पदग्रहन, समाजभूषण पुरस्कार, व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन सटाणा बाजार समितीचे संचालक जेष्ठ नेते श्रीधर कोठावदे, समको चे संचालक जयवंत येवला, सचिन कोठावदे, कैलास येवला, रूपाली कोठावदे, कल्पना येवला, प्रवीण बागड, राजेंद्र येवला, डॉ व्ही के येवलकर, कळवण बँकेचे माजी चेअरमन गजानन सोनजे, योगेश महाजन, संजय मालपुरे, चंद्रकांत कोठावदे, विलास शिरोरे, रूपेश कोठावदे, उपस्थित होते. या वेळी समाजाच्या वतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पंकजकुमार मेतकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विनोद पाटकर, नाशिक सन्मित्र चे विश्वस्त गिरीश महाजन, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव भावेश कोठावदे यांना आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते देण्यात आला या वेकी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात समाज एकजुटी ची गरज का आहे.
सामाजिक बांधिलकी जपत समाजाने समजला पुढे का नेले पाहीजे याचे उदाहरण देत समाजभूषण असलेल्या सर्व मान्यवराचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी रुपाली कोठावदे, सचिन कोठावदे, विलास शिरोरे, भावेश कोठावदे जयश्री केले, वैशाली चिंचोरे,यांची भाषणे झाली. तर नूतन विश्वस्त अध्यक्ष तुकाराम चिंचोरे, अध्यक्ष कैलास केले, युवा मंच अध्यक्ष भुषण भदाणे, यांचा सत्कार यावेळी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रसात्विक निलेश गौतम यांनी केले तर सुत्रसंचलन राजेंद्र अमृतकार यांनी केले. आभार मुरलीधर मुसळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी उपाध्यक्ष मनोज बधान ,सागर चिंचोरे, अमोल अमृतकार, किशोर चिंचोरे, तेजस चिंचोरे, हर्षल चिंचोरे, अमोल बाविस्कर, निबा केले,हरी केले, बापू गौतम, पंकज बधान, अशोक गौतम, योगेश चिंचोरे, तुषार चिंचोरे, शुभम चिंचोरे, उमेश चिंचोरे, तुषार शेंडे, परेश चिंचोरे, स्वप्नील चिंचोरे, निखिल चिंचोरे, कल्पेश चिंचोरे आदींनी परिश्रम घेतले.