सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा मर्चटस् को. ऑप. बँकेची डांगसौदाणे येथील नुतन शाखा निश्चितपणे आदिवासी भागातील जनतेला सेवाभिमुख ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र अर्बन को. ऑप. बँक पेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांनी व्यक्त केला.तालुक्यातील डांगसौदाणे येथे समको बँकेच्या तिसर्या शाखेचा शुभारंभ श्रीक्षेत्र दोधेश्वर येथील महंत स्वामी हरी ओमानंद पुरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रंसगी अध्यक्षस्थानावरून अजय ब्रम्हेचा बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणुन समको बँकेचे माजी चेअरमन श्रीधर कोठावदे, रमेश देवरे, नामपूर वाणी समाजाचे अध्यक्ष मयुर अलई, नामको संचालक महेंद्र बुरड, जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष सुरेश बागड उपस्थित होते.
यावेळी अजय ब्रम्हेचा म्हणालेत की, समको बँकेची आर्थिकस्थिती भक्कम आहे. नजीकच्या काळात लवकरच बँक 150 कोटी रूपयांच्या ठेवींचा पल्ला गाठेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी चेअरमन जगदीश मुंडावरे, संचालिका रूपाली कोठावदे, उपसरपंच पंढरीनाथ बोरसे, निलेश गौतम, मुरलीधर मुसळे यांची भाषणे झालीत.
व्यासपिठावर संचालक पंकज ततार, जयवंत येवला, कैलास येवला, स्वप्निल बागड, विठ्ठल येवलकर, महेश देवरे, अभिजीत सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, रमणलाल छाजेड, भास्कर अमृतकर, कल्पना येवला, प्रकाश सोनग्रा, दिलीप येवला, तुषार खैरणर, अशोक गुळेचा, विजय भांगडीया, दत्त्तात्रेय कापुरे, पियुष येवला, मुख्यकार्यकारी अधिकारी देविदास बागडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हा. चेअरमन सचिन कोठावदे यांनी तर आभार प्रदर्शन संचालक कैलास येवला यांनी केले.