सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर सटाणा तालुक्यातील मोरेनगर गावातील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी सरकारने कांदा निर्यात मूल्य रद्द केलेल्या निर्णयावर व्यंगचित्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्यात कांदा निर्यातमूल्य रद्द करण म्हणजे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असे म्हटले आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात शुल्काचा घेतलेला निर्णय तात्पुरता तर नाही ना? असा प्रश्न देखील या व्यंगचित्रातून विचारला आहे. त्यांनी कांद्यावर काढललेले हे व्यंगचित्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.