नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यांनर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सटाणा तालुक्यातील हरणबारी ते हातनूर या रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून पाणीच्याचे डबके साचले आहे.
त्यामुळे वाहनधारकांना व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्यावरील खड्ड्यात चक्क भात रोपांची लागवड करत गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करत प्रशासना विरोधात निषेध व्यक्त केला.








