सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सटाणा बाजार समिती समोर असलेले एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यानी पहाटेच्या सुमारास गॅस कटरच्या साह्याने फोडत त्यातील साडेतेरा लाखाची रोकड लंपास केली आहे. पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास ही गोष्ट लक्षात आली. चोरट्यानी आत प्रवेश करताच सुरवातीला सायरनची वायर कापली त्यानंतर सीसीटीव्ही बंद केले. त्यामुळे चोरट्याना शोधण्याचे मोठे आवाहन सटाणा पोलिसांपुढे उभे ठाकले असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करुन या चोरांचा शोध सुरु केला आहे.