डांगसौंदाणे- साल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारींच्या निवास्थानाची बांधकाम पूर्ण होण्याआधीच दुरवस्था झाली आहे. २०१४ मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून साल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकांरीसाठी निवास्थान बांधकाम करण्यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सिंधुताई सोनवणे यांच्या माध्यमातुन १६ लाखांचा निधी मंजूर केला होता. साल्हेर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी सदरचे बांधकाम करण्यास ग्रामपंचायत सक्षम असल्याचा दाखला देत हे काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्याचा घाट घातला. मात्र तत्कालीन ग्रामसेवक सरपंच यांना टक्केवारीच्या लागलेल्या वाळवीमुळे हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही तर तत्कालीन अधिकारीना ही हे काम पूर्ण करून घेता आले नसल्याने १६ लाखाच्या निधी वाया गेला आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरवा करून ही हे काम संबंधित अधिकारी पूर्ण करून घेऊ शकले नाही. तर ज्या पदाधिकारी आणि ग्रामसेवकांनी सरकारी पैसे स्वताचा समजत निधीचा गैरवापर केला. त्यांच्यावर ही प्रशासणाने कार्यवाही केलेली नाही. या सर्व प्रकारात मात्र ही इमारत दवाखाण्यासाठी जैविक कचरा संकलन केंद्र बनली आहे. यांनातर याच दवाखाण्याला मात्र मुख्य इमारत दुरुस्ती साठी तत्कालीन आरोग्य सभापती यतीन पगार यांच्या काळात ५० लाखांचा निधी मिळून दवाखाण्याला वैभव मिळाले. मात्र येथे आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारीचे निवासस्थान जैसे थे राहिले.मात्र सध्या कोविडस्थितीत वैद्यकीय अधिकारींना दवाखान्याच्या गोदामात आश्रय घ्यावा लागतो हे विशेष आहे. या कामातील लोखंडी ग्रील(खिडक्या) मात्र तत्कालीन सरपंचाने आपल्या घरी ठेवल्याची चर्चा आहे. प्रशासनाने याकडे डोळेझाक करत ही १६ लक्ष रुपयांची इमारत दुर्लक्षित म्हणून पूर्ण होण्याआधीच सोडून दिल्याने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल आता या भागातील सर्वसामान्य आदिवासी जणता विचारत आहे.
…
चुकीच्या निर्णयामुळे निधीचा अपव्यय
आदिवासी भागातील बहुतांश ग्रामपंचायती मध्ये विकासकामे हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येतात पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना येणाऱ्या निधीतून हा विकास होतो. मात्र काही ठिकाणी ग्रामसेवक व स्थानिक पुढारी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे निधीचा अपव्यय होतो. साल्हेर चे वैद्यकीय निवासस्थान हे त्याचे उत्तम उदारहण आहे.
संजय सोनवणे, संचालक, बाजार समिती सटाणा
….
कामाची चौकशी करुन कारवाई करु