सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील बस स्थानकात बसमध्ये चढणा-या वृध्द आजीच्या हातीतील सोन्याची बांगडी कटरने कापून बांगडी घेऊन पळणा-या अट्टल चोरट्याला बस स्थानकाल चालक आणि वाहकांनी पाठलाग करत पकडले आहे. ब्राम्हणपाडे येथील ताराबाई बोरसे या पती सोबत नाशिक येथून सटाणा बस स्थानकात उतरल्या असता चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कटरने कापून पळ काढला. मात्र त्याचवेळी बस स्थानकातील चालक-वाहक अन्य लोकांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून आणले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्याला पाहण्यासाठी बस स्थानकात मोठी गर्दी झाली होती.