अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सटाणा शहरातील शिवसैनिकांनी राज्य महामार्गावरील सटाणा बसस्थानकसमोरील चौकात शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ फलक घेऊन मोठया संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी शिवसेना झिंदाबाद. उध्दवसाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है. .. शिवसेना अंगार है…बाकी सब भंगार है.. अशा घोषणा त्यांनी दिल्या. शहराध्यक्ष जय प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील शिवसैनिक सटाणा बसस्थानक परिसरात जमा होऊन राज्यमहामार्गावरील रस्त्यावर उतरत घोषणा देत रस्ता दुर्तफा बंद केला होता. आपल्या पक्षप्रमुखांविषयी झालेल्या प्रकाराची तीव्र नाराजी व्यक्त करीत गद्दरांना क्षमा नाही दुर्देवाने पक्षातीलच विघ्नसंतोषी आज गद्दार झाले आहेत. आजपर्यंत अनेकांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली, प्रयत्न केले मात्र शेवटी तेच संपले असे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत येथील शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी राहुन त्यांना साथ देतील, त्यांचा आदेश मानतील. आज ५६ गेली चालतील परंतू गद्दारांना त्यांची जागा शिवसैनिक निवडणुकीत दाखवतील असेही सोनवणे म्हणाले. यावेळी सर्व आजी-माजी पदाधिकारी रिक्षा युनियन सेना, युवा सेना विद्यार्थी व शिवसैनिक उपस्थित होते.