अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सटाणा तालुक्यातील वनोली येथे अंगावर भिंत कोसळून विवेक मंगेश भामरे या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा सोमवारी मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून सटाणा परिसरात पाऊस झाल्याने घराच्या भिंती ओल्या झाल्या होत्या, विवेक भिंतीला पाठ लावून अभ्यास करीत असताना अचानक भिंत कोसळली आणि तो मातीच्या ढिगाऱ्या खाली दाबला गेला. भिंत कोसळण्याचा आवाज आल्या नंतर शेजारी राहणारे आजी-आजोबा,काका धावत आले. मात्र वीज पुरवठा खंडित झालेला असल्याने विवेक ढिगाऱ्यात आडकल्याचे समजून आले नाही. काही वेळाने बाहेर गेलेले आई वडील घरी आल्यावर त्यांनी विवेकला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कुठेच दिसत नसल्याने मातीचा ढिगारा बाजूला केला असता त्याचा मृत देह आढळून आला. त्यास सटाणा येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केल्याने भामरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला..