जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आदेश…
सटाणा – सटाणा शहरातील ट्रामा केअर सेंटर येथे डिसीएचसी सेंटर सुरू करण्याबाबत निर्देश अखेर आज जिल्हा परिषेदेचे मुख्यकार्यकरी अधिकारी लीना बनसोडे यांनी दिले आहेत. सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयाजवळच्या ट्रामा केअर सेंटर येथे करोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे ३० खाटाचे अद्ययावत, व सुसज्ज डिसीएचसी सेंटर सुरू करावेत या मागणीसाठी माजी आमदार दीपिका चव्हाण यांचेसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाभुसे यांचे कडॆ सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पार्श्वभूमीवर ३० एप्रिल रोजी नाशिक येथे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सटाणा येथे डिसीएचसी सेंटर ला मजुरी दिली होती. या नंतर ५ मे रोजी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सटाणा येथे भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली होती. यानंतर सेंटर सुरू करण्यासाठी तांत्रिक बाबी पूर्ण करून ऑक्सिजन लाईन व पाईप फिटिंग करण्यात आली.
सटाणा शहर व परिसरातील जनतेसाठी ऑक्सिजन असलेले डिसीएचसी सेंटर महत्वपूर्ण असून संभाव्य कोरोनची तिसरी लाट नजरे समोर ठेवून उपरोक्त मागणी केली होती, यात कोणतेही राजकारण नसल्याची भूमिका माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी व्यक्त केली होती. तर विरोधकानी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून भूमिका घेतल्याचे दुःख व्यक्त केले.
दरम्यान आज बुधवार १९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास dchc सेंटर बाबत वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रुग्णलाय सटाणा यांना आदेश प्राप्त झाला असून या नुसार ३० खाटाचे ऑक्सिजन बेड मंजूर करण्यात आले आहेत. तसेच या साठी आवश्यक आहार, सफाई कामगार, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेन्टीलेटर व अन्य तांत्रिक बाबींना मंजुरी देण्यात आली आसल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी दिले आहेत.