सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात राज्याच्या सीमेवरून महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या अवैध रित्या गाईंची तस्करी करणाऱ्या दोघा पिकअप वाहनासह तस्करांसाठी असलेली मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी गो सेवकांमुळे पकडण्यात यश आले आहे. यामध्ये १३ पशुंची सुटका करण्यात येऊन सटाणा पोलिसात या तस्करांविरुद्ध गोवंश संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गुजरात सरहद्दीतील काही गावामधून गोवंशची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याच्या घटना अनेक वेळी उघडकीस आल्या आहेत साल्हेर या सीमावर्ती भागातुन हे वाहने येऊन ताहराबाद मार्गे मालेगाव शहरात हे तस्करी चे रॅकेट मोठ्या प्रमाणावर चालते रात्रीच्या वेळेस।चालणारा हा सर्व प्रकार अनेक वेळा गो सेवक मोठ्या हिमतीने प्रयत्न करून हाणून पाडतात .मात्र अनेक वेळा रात्रीची वेळ आणि तस्करांची तस्करी करण्याची पद्धत बदलत मार्ग बदलून वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होत असल्याचेही समोर आले आहे.
अनेक तरुण गो सेवक म्हणुन काम करीत असताना अनेक वेळा तस्करी करणाऱ्या वाहनांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत असतात आज पहाटे असाच काही प्रकार साल्हेर परिसरातील घुलमाल व ततानी जवळ घडला तस्करांना साल्हेर परिसरात गो सेवक आल्याचे लक्ष्यत आल्याने त्यांनी मार्ग बदलत डांगसौंदाणे भागातून वाहने नेण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी केलेली मदत आणि परिसरातून गो सेवकांची झालेली मदत या मुळे दोघे पिकअप वाहन व तस्करांसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट गाडी पकडण्यात आली. या वेळी मात्र संबंधित तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले तर एक आरोपी पकडण्यात गो सेवकांना यश आले .पहाटे पोलिसांना माहिती दिल्यानंतर सटाणा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघा पिकअप वाहनासह १३ जनावरे व एक स्विफ्ट गाडी असा १६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या अश्फाक अहमद निसार अहमद वय वर्ष ३८ रा.मालेगाव याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन अन्य आरोपींचा शोध सटाणा पोलीस घेत आहेत याबाबत सटाणा पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा जगनाथ लव्हारे, जयंतसिंग सोळंकी, निवृत्ती भोये, सागर बेलुस्कर तपास करीत आहेत
तस्करांची मोठी टोळी कार्यरत
साल्हेर पासुन।गुजरात राज्यात जाण्यासाठी असलेल्या मार्गाचा तस्करी केलेले जनावरे वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. या भागात काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याने अनेक वेळा वाहने पकडणे।किंवा त्यांचे लोकेशन।घेणे गो सेवकांना अवघड होते म्हणुन कायम वाहनाचा पाठलाग गो सेवकांना करावा लागतो या मध्ये हे तस्कर या वाहनधारकांवर मिरची पूड किंवा अन्य विषारी पावडर फेकण्याचा प्रकार ही करतात आजच्या घटनेतील स्विफ्ट गाडीतुन अशीच काही पावडर फेकण्यात येत होती.
यामुळे पाठलाग करणाऱ्या वाहनाचा काच पूर्ण पणे पांढरा पडत होता तर दुचाकी धारकांचे डोळे आग करीत असल्याचा अनुभव काही गो सेवकांनी सांगितला महाराष्ट गुजरात सीमेवर काही भागात।सटाणा।पोलिसांची।हद्द।येते तर काही भागात जायखेडा पोलिसांची हद्द आहे दोघा पोलीस ठाण्यांनी।रात्रीच्या वेळीस या भागातील गस्त वाढविण्याची मागणी गो सेवकांनी केली आहे.