डांगसौंदाणे – येथील ग्रामदैवत जलदुर्गा माता यात्राउत्सवाचे आयोजन अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर करण्यात आले आहे. यात्रेचे ११ वे वर्ष असुन ३ दिवसीय यात्रेचे नियोजन ग्रामस्थ व यात्रा समितीने केले आहे. २ मे ते ४ मे दरम्यान होणाऱ्या या यात्राउत्सव काळात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.
२ मे ला दुपारी ग्रामदैवत जलदुर्गा रथ मिरवणुक काढण्यात येणार आहे. परंपरेनुसार सटाणा पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार हे रथ पुजन करतील या रथ सेवेचे आयोजन अनंत गायकवाड यांनी केले आहे. ३ मे ला पहाटे जलदुर्गा माता मुर्ती अभिषेक व पुजा उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, व सौ योगिता सोनवणे, तलाठी आतिष कापडणीस,व वैशाली कापडणीस, शेतकरी योगेश सोनवणे, व वैशाली सोनवणे या तिघा दाम्पत्याच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर याच दिवशी भरणाऱ्या यात्रे निमित्त आरम नदीपात्रात भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या कुस्त्यांचे आयोजन यात्रा समिती व तुळजाभवानी एज्युकेशन चे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी केले आहे. ४ मे ला रात्री ८ वाजता समाजप्रबोधनकर हभप निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर यांचे जाहीर कीर्तन ठेवण्यात आले असुन याचे आयोजन प्रगतशील शेतकरी विठ्ठल नामदेव सोनवणे व यात्रा समितीने केले आहे. या यात्रा उत्सव काळात व्यापारी व भाविक वर्गाने व कुस्ती शोकिनानी मोठ्या प्रमाणात येण्याचे आवहान यात्रा कमिटी व डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने केले आहे. यात्रे निमित्त मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे व व्यापारी आबासाहेब देशमुख यांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
महाप्रसादाचे आयोजन
कोरोना काळात गत २ वर्ष यात्रा उत्सव साजरा करण्यात अडचणी आल्या होत्या या वर्षी यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी नियोजन करीत यात्राउत्सव मोठया उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. यात्रे निमित्त कीर्तन, भव्य कुस्ती दंगल, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यासाठी ग्रामस्थाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.
सोपान सोनवणे, प्रमुख ग्रामदैवत जलदुर्गा यात्रा समिती, डांगसौंदाणे