डांगसौंदाणे- डांगसौंदाणे-ततानी रस्त्यावर आज रात्री ८ च्या सुमारास मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात घुलमाळ (साल्हेर)येथील दोघा आदिवासी तरुणांचा या भीषण अपघात जागीच मृत्यू झाला आहे. मोहन मंगळु बागुल (२०) दिनेश नामदेव ठाकरे(१८) दोघे रा.घुलमाळ ता बागलाण हे तरुण डांगसौंदाणे येथून आपल्या गावी जात असताना डांगसौंदाणे शिवारातील रघुनंदन फार्मच्या समोर रात्रीच्या वेळेस हिरो कंपनीची स्प्लेपेंडर मोटरसायकल क्रमांक MH41 BC 8556 या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सटाणा पोलिसांना स्थानिक नागरिकांनी कळविल्यानंतर सटाणा पोलिसांनी घटनास्थळी येत दोघे मृतदेह डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले. तर पुढील तपास सटाणा पोलीस निरीक्षक सुहास अनुमोलवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. जयंतसिंग सोळंकी करीत आहेत.