सटाणा – डांगसौंदाणे येथे आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने सोसायटीच्या प्रांगणात आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांचे समवेत निबंधक जितेंद्र शेळके, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती पंकज ठाकरे,कैलास बोरसे,सोमनाथ सूर्यवंशी ,मधुकर ठाकरे, आदिवासी विकास महामंडळ कळवण विपणन निरीक्षक पी के चौधरी ,आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी डांगसौंदाणे चे चेअरमन हिरामण बागुल ,व्हा. चेअरमन शांताबाई गायकवाड, हे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार दिलीप बोरसे यांनी अनिष्ठ तफावतीत गेलेल्या सर्वच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील शेतकरी सदस्यांची सर्वपक्षीय नेत्यांकडून दिशाभूल करत फसवणूक झाली असून आज त्या डबघाईस गेल्या आहेत. त्या पुनर्जीवित करणे ही आदिवासी पट्ट्यासाठी काळाची गरज असून आपले सर्वांचेच आद्य कर्तव्य असून हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समवेत मी शासनदरबारी मांडणार असल्याचे सांगितले. तसेच आदिवासी पट्ट्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याच्या सूचना केल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती पंकज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पंकज ठाकरे यांना आपल्या कारकिर्दीत तरी डांगसौंदाणे येथ बाजार समिती सुरू होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना ठाकरे यांनी लवकरच प्रशासकीय बाबींची पूर्तता करून उप बाजार समिती सुरू करण्याविषयी उपस्थितांना आश्वासित केले. विपणन निरीक्षक पिके चौधरी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा तसेच शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मका या भरड धानाची खरेदी या केंद्रावर होणार असून नोंदणीकृत शेतकऱ्याकडून एकरी १५ क्विंटल मका प्रतिक्विंटल १८७० रुपये दराने खरेदी केला जाणार असल्याची माहिती दिली तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला मका विक्रीसाठी आणून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक नारायण सूर्यवंशी, दीपक वाघ, रविंद्र सोनवणे, वसंत बागुल, प्रमोद बैरागी, ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद केल्हेे, पंढरीनाथ सोनवणे ,दगाजी अहिरे,तसेच देविदास बागुल, दिनेश सोनवणे ,संजय संतोष सोनवणे पत्रकार महेंद्र सोनवणे, नथू बोरसे ,सचिव जयवंत देशमुख ,कर्मचारी सोमनाथ साबळे आदीं सोबत बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.