डांगसौंदाणे – बागलाणच्या पश्चिम भागात काल पासुन वातावरणातील झालेला बदल सतत सुरू असलेली पावसाची रिपरिप यामुळे मोठ्या मेहनतीने जगवलेली उन्हाळ कांदा रोपे खराब होण्याची शक्यता शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे तर अर्लीच्या द्राक्ष बागांना ही मोठ्या प्रमानावर या वातावरणाचा फटका बसणार आहे. काढणी योग्य बागांना या वातावरणामुळे मोठा फटका बसणार आहे कवडीमोल दरात शेतकऱ्यानं हा माल विकावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर तालुक्यात अनेक मेंढपाळाचे ३०० पेक्ष्या अधिक मेंढ्या मृत झाल्याची प्राथमिक माहिती महसूल विभागाने दिली आहे.मृत जनावरांचे पंचनामे करण्यात येणार असुन नुकसानग्रस्त शेतपिकांचे ही पंचनामे करण्यात येणार आहेत. चार वर्षे पासुन अर्ली द्राक्ष बागांना याचा फटका बसत असुन, आधीच लेट पावसाळ्यामळे कांदा बियाणे शेतकऱ्यांनी लेट टाकली होती १५ ते २० दिवसात ही रोपे लावणी अली असतांना आता या रोपांना या अवकाळी पाऊस आणि हवेतील प्रचंड गारठ्या मुळे बुरशी जन्य रोगांचा सामना करावा लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांचे खरिपातील मका काढणी करून शेतात पडला असल्याने मका सह जनावरांसाठी असलेला मक्याचा चारा ही ओला झाला आहे. संपूर्ण तालुक्यातील शेतीला या अवकाळी चा फटका बसला आहे. काही ठिकाणी उन्हाळा कांद्याच्या लागवडी झालेल्या आहेत त्या ही कांद्याला या अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. बागलाण मध्ये जास्त प्रमाणावर या अवकाळीचा फटका मेंढपाळ व वाड्या वस्ती वर राहणाऱ्या लोकांना बसला आहे.