आगामी नगरपरिषद ,जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची कसोटी…
डांगसौंदाणे-(निलेश गौतम) कधी काळी काँग्रेस पक्ष्याचा बालेकिल्ला म्हणून नावलौकिक असलेल्या बागलाण काँग्रेसला मात्र आता खंबीर नेतृत्वा अभावी अवकळा आलेली दिसून येत आहे. दिवसेंगणिक पक्ष कमजोर होतांना दिसत असल्याने खरे काँग्रेस समर्थक मात्र आता या नेतृत्वाला कंटाळली असून पक्षात मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाला तरच आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसह नगरपरिषद निवडणुकीत पक्ष तग धरू शकेल. अन्यथा पक्ष्याची वाताहत झाल्या शिवाय राहणार नाही. अशीच काहीशी अवस्था सध्या पक्षाची झालेली दिसून येत आहे.
पक्षाकडे अनेक प्रभावित तरुण चेहरे असतांना पक्षाने गेली अनेक वर्षे तालुका निवासी नसलेल्याना पक्षाचे तालुकाध्यक्ष करून पक्षा सह कार्यकर्त्यांची वाताहत केल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकीत पक्षाला भरघोस यश संपादित करायचे असल्यास पक्ष्याला खंबीर नेतृत्वासह स्थानिक नेतृत्वाला प्रवाहात आणत मोठी जबाबदारी द्यावी लागणार आहे. सद्यस्थितीत पक्षा कडे एक जिल्हा परिषद सदस्य तर दोन पंचायत समिती सदस्य असल्याने तालुक्याचा विचार करता हे संख्याबळ अतिशय तोकडे आहे. अशा परिस्थितीत पक्षाला वेळ आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारा तालुका प्रमुख असला तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला आपले अस्तित्व टिकवून ठेवता येणार आहे. अन्यथा मोठे अपयश पक्षाला येण्याचे जाणकार कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. आज ही पक्षात कायम सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये प्रा. अनिल पाटील, शहराध्यक्ष किशोर कदम, नाशिक जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन कोठावदे ,नगरसेवक राहुल सोनवणे, पंचायत समिती सद्स रामदास सूर्यवंशी, संजय जोपळे, जि प सदस्य रेखा पवार, भास्कर परशुराम अहिरे, सोमनाथ सूर्यवंशी नारायण सावंत,प्रवीण सावंत,दिनेश कापडणीस,रेखाताई अहिरे यांच्या सारखे चळवळीत राहणारे चेहरे असुन पक्षाशी कायम प्रामाणिक राहणाऱ्या मध्ये यशवंत बापू अहिरे,विजय पाटील,प्रल्हाद पाटील यशवंत पाटील,राघो अहिरे,अभिमन सोनवणे गुलाबराव कापडणीस,पंडितराव मोरे,नारायण खैरनार,राजाराम गांगुर्डे, उत्तराताई सोनवणे,सुरेखा पगार यांच्या सारखे मार्गदर्शक आहेत. मात्र गेली अनेक वर्षे स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला विसंवाद मात्र पक्ष्याला बळकटी देऊ शकला नाही. मधल्या काळात मोठी हानी पक्ष्याची झाली आहे. मात्र यातून वरिष्ठ पक्ष नेतृत्व बोध घेत नसल्याने आगामी काळात पक्ष्याच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या कसमादेतच जर पक्ष कमजोर झाला तर याला जबाबदार कोण ? असा ही काहीसा सवाल आता सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता विचारताना दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत जर तालुक्याची जबाबदारी एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या हातात गेली नाही तर पक्ष्याची तालुक्यातील होणारी वाताहत कोनीही टाळू शकत नाही विद्यमान आमदार खासदार भाजपाचे तर माजी आमदार राष्ट्रवादीचे असल्याने आगामी काळात दोघा मातब्बर पक्ष्यांशी टक्कर देणारा तालुका प्रमुख आणि दमदार कार्यकर्त्यांची फळी उभी न केल्यास मोठे राजकीय नुकसान पक्षाला सोसावे लागणार आहे .