डांगसौंदाणे –स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डांगसौंदाने येथे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या उपस्थितीत डिजिटल सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. येत्या पंधरवड्यात ग्रामीण भागात घरपोच मोफत सातबारा खाते उतारा वाटप करण्यात येणार असल्याचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी सांगितले आहे. बागलानचे प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जिजाबाई पवार, बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे, पंकज बधान, पत्रकार निलेश गौतम यांच्या उपस्थितीत या डिजिटल सातबारा उताऱ्याचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त उपस्थित शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारा देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शेतकरी केदा मोरे, शशिकला चिंचोरे, मंदोदरी गौतम ,सतीश चंद्रात्रे, मनोज सुलक्षण, चेतन सोनवणे, प्रकाश वाघ, बाबुराव वाघ ,स्वप्निल चिंचोरे, बापू बोरसे ,आदींना डिजिटल सातबाराचे वाटप मंडळ अधिकारी हिरे व तलाठी अतिश कापडणीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.