निलेश गौतम
डांगसौंदाणे- ग्रामविकासासाठी ग्रामपंचायत हे खरे मंदिर असुन ग्रामविकासाचा रथ या मंदिरातून चालविणारा विठ्ठल (सरपंच) भक्कम असला तर हा विकास रथ गावाला आरोग्य सह भौतिक सुख सुविधा देणारा ठरतो यासाठी जनतेची साथ महत्वाची असुन ग्रामपंचायतीकडे सर्वांनी एका मंदिराच्या भावनेने पाहिले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहत नाही यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे असं ही मत भास्कर पेरे पाटील यांनी व्यक्त केले. डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रामविकास व्यख्यान मेळाव्यास व महिला मेळाव्यास आदर्श ग्राम पाटोदा चे जनक भास्कर पेरे पाटील यांनी संबोधित केले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाण चे आमदार दिलीप बोरसे, प्रमुख अतिथी म्हणून जी. प. सदस्य यतीन पगार बागलाण पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती आहिरे या होत्या.
येथील दत्त मंदिर चौकात झालेल्या या कार्यक्रमास गावातील महिला भगिणीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पेरे पाटील यांनी स्वच्छता व आरोग्य विषयक मार्गदर्शन करीत गाव एक आदर्श नगरी करण्यासाठी गाव हागणदारी मुक्त करणे गरजेचे असुन सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन महत्वाचे आहे असं सांगत सर्वाधिक आजार हे दूषित पाण्यामुळे होत असल्याने सर्वात आधी पाणी हे स्वच्छ व चांगले देणे ग्रामपंचायतीचे काम आहे. ग्रामपंचायतीचे सर्व कर नियमित भरून आपल्या भौतिक सुविधा पूर्ण करून घेणे हे स्थानिक ग्रामस्थांचे काम असल्याचे सांगत ज्या गावात स्वच्छता तिथे वैद्यकीय सेवेची सुद्धा गरज पडत नसल्याचे सांगत लोकांनी ठरवले तर ग्रामविकास करणे अवघड नसल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदर्श ग्राम नियोजन समितीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी केले तर प्रमुख अतिथी सह आदर्श ग्रामचे प्रणेते भास्कर पेरे पाटील यांच्या कार्याचा परिचय निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे यांनी केला या वेळी आमदार दिलीप बोरसे यांनी डांगसौंदाणेच्या विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगत पश्चिम भागातील विकसीत ग्राम डांगसौंदाणे एक आदर्श नगरी असल्याचे गौरवोद्गार काढले या वेळी गावातील सर्व कुटुंबातील महिला भगिनींना कचरा साठवणुकीसाठी डसबीन चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच सुशील सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली बधान, विजय सोनवणे, यशोदा सोणवणे, लता वाघ रामदास पवार, पमाबाई सोनवणे,पंकज बधान , दिलीप आहिरे, आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.