सटाणा – काँग्रेस पक्षाच्या राजीव गांधी पंचायत राज समितीच्या उत्तर महाराष्ट्र संघटक पदी बागलाण पंचायत समितीचे सदस्य संजय यशवंत जोपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सटाणा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकी प्रसंगी वरील नियुक्तीची घोषणा महाराष्ट्रचे प्रभारी नारायण राठोड यांनी केली.
पंचायत राज संघटनच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद स्तरावर काम करुन काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे प्रतिपादन नारायण राठोड यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील होते.प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अनिल पाटील यांनी केले.काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे,काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष नारायण खैरनार,नगरसेवक राहुल पाटील,पंचायत समिती सदस्य संजय जोपळे,माजी पंचायत समिती सदस्य संजय गरूड, जि.प.सदस्या रेखा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आण्णा सोनवणे,भिका सोनवणे, सचिन कोठावदे, नारायण सावंत, प्रवीण सावंत, रिजवान सय्यद, परशुराम अहिरे, शरद पवार,सुरेश कंकरेज,अरुण नंदन,निखिल कासारे,प्रवीण पवार,राजू गावित,देविदास पवार,यशवंत पवार,मिलिंद चित्ते, ग्यानदेव पवार,युवराज दाणी,सचिन जाधव, राहुल सुर्यवंशी,रोहित चौरे,निलेश चौरे,गोकुळ बागुल व कार्यकर्ते उपस्थित होते.रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले.