सटाणा – सटाणा नगरपालिकेच्रा प्रभाग क्रमांक ९ मधील मंजूर असलेली कामे सुरू करण्यासाठी वारंवार निवेदने देऊनही नगरपालिका प्रशासनासह नगराध्यक्ष याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या प्रभागातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरेखा प्रकाश बच्छाव यांच्यासह महिला भगिनींनी नगरपालिकेचा प्रवेशद्वारासामोर आज सकाळी उपोषण सुरू केले. उपोषणास स्थळी महाविकास आघाडीचे पदाधिका-यांनी भेट देऊन नगरपालिकेच्या प्रवेशव्दारास कुलूप लावले. यावेळी तहसीलदार जितेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गारकवाड व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी उपोषणार्थींची मागण्यासंदर्भात १४ ऑगस्ट प्रभागातील आरोग्य विषयक समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने नगरपालिकेचे प्रवेशव्दाराचे कुलूप उघडून उपोषणार्थीनां तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
नगरसेविका बच्छाव यांनी दिलेल्या निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ असलेल्या संकुलवरील काम सुरू व्हावे, महीलांच्या शौचालयाचे काम पुर्ण करून सेप्टी टँकवर स्लॅब टाकणे, पुरुषांचे शौचालय पाडून त्या जागी ओपन जिम व उद्यान करणयात यावे, दलित वस्ती साठी रमाई घरकुल रोजना मंजूर असतांनाही ती राबविण्रात आलेली नाही त्याची अमंलबजावणी व्हावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ासमोरील गटारीवर जाळी बसविण्यात यावी, जुने अमरधामला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, बौद्ध विहारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, मुल्लावाड्यात गटारी टाकण्याच्या कामाला सुरुवात करावी यासह विविध मागण्या साठी उपोषणा करण्यात आले. उपोषणास यमुनाबाई पवार,सिंधुबाई बच्छाव, अंजना पवार, कल्पना पवार,अमीना काकर,आरूणा बच्छाव, रेखा पाटोळे,सुनिता पाटोळे,शानुबाई काकर,कविता थोरात,आलका बाविस्कर, रमाबाई रेजवळ आदी सामिल होते.
यावेळी महाविकास आघाडीचे माजी आ.संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पांडूरंग सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, नगरसेवक दिनकर सोनवणे,माजी नगरसेवक अरविंद सोनवणे,मनोज सोनवणे,अनिल कुवर,शिवसेनेचे माजी शहराध्रक्ष शरद शेवाळे,आरपीआरचे भारत बच्छाव,राष्ट्रवादी रुवकचे सुमित वाघ,रत्नाकर सोनवणे,दिपक रौदळ,राजेंद्र देवरे,प्रकाश बच्छाव, बबु सोनवणे,फारूक तांबोळी,आनंद सोनवणे, यांच्यासह महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.