डांगसौंदाणे – नाशिक जिल्ह्यातील “सर्वोत्कृष्ठ तहसीलदार “म्हणून बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांचे नाव नाशिक महसूल विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तहसीलदार बागलाण यांना याबाबत अवगत केले आहे. बागलाणला दोन वर्षापासून तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र इंगळे पाटील हे कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून तालुक्याला परिचित झाले आहेत. शेतकऱ्यांचे रस्ते, जमिनी विषयक वाद, व महसुली वाद सोडविण्यासह सुरळीत रेशन वाटप, विविध दाखले रेशन कार्ड, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, कोरोना काळात तालुक्यातील आरोग्य सेवेवर असलेले नियंत्रण यासह तालुक्यातील अवैध रित्या होणाऱ्या गौण खनिज वर करण्यात येत असलेल्या कठोर कार्यवाही साठी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना नाशिक महसूल विभागाने आदर्श तहसीलदार म्हणून सन्मानित केले आहे. या निवडीमुळे तालुक्यातील विविध संघटना व लोकप्रतिनिधींनी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांचे अभिनंदन केले आहे.