सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मोसम नदी पात्रातून शासकीय वाळू लिलाव करण्याचा घाट घातला जात असून त्यास मोसम खोऱ्यातील गावांचे ग्रामस्थ एकवटले आहे. संतप्त ग्रामस्थांनी औरंगाबाद – अहवा महामार्गावर खामलोण फाट्यावर रास्ता रोको आनंदोलन सुरू केले केले आहे.
नामपूर, द्याने, उत्राणे, अंबासन, ब्राह्मणपाडे , जायखेडा , खमालोन, राजपूरपाडे, गौराणेसह मोसम नदी काठच्या गावातील ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाळू उपश्यामुळे परिसरातील शेती व्यवसाय धोक्यात येणार असून शासनाने त्वरित वाळू लिलावाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आंदोलक ग्रामस्थांनी केली.
satana Mosam River Sand Auction Agitation