इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सटाणा कृषी बाजार समितीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत श्री यशवंत शेतकरी पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवीत बाजार समितीची सत्ता एकहाती मिळविली आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल आणि यशवंत शेतकरी विकास पॅनल यांच्यात तीव्र लढत पाहायला मिळाली. विशेषतः लखमापूर येथील सर्व विरोधक एकत्र आल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी झाल्या. त्यातच पूर्व आणि पश्चिम असा प्रांतवाद उफाळून आला.
नेत्यांची रणनीती आणि विजय
पश्चिम भागातील नेते बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, सटाणा दक्षिण भाग सोसायटीचे राहुल सोनवणे, आणि शिवसेना (उबाठा) गटाचे डॉ. प्रशांत सोनवणे यांनी एकत्र येत यशवंत शेतकरी विकास पॅनलची निर्मिती केली. त्यांनी शेतकरी विकास पॅनलसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यांनी मतदारांना पटवून दिले की विरोधक सत्तेसाठी कसे एकत्र आले आहेत आणि बाजार समिती ही सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी कशी महत्त्वाची आहे. त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार केला आणि विजय मिळविला.
विजयी उमेदवारांची यादी
श्री यशवंत शेतकरी पॅनल
सोसायटी सर्वसाधारण गट: रवींद्र विठ्ठल सोनवणे, राहुल केदा सोनवणे, दिनेश अशोक गुंजाळ, मनोहर दयाराम बिरारी
आर्थिक दुर्बल गट: दिपक रौदळ
भटक्या विमुक्त प्रवर्ग: पुंजराम वानले
महिला राखीव: सिंधुबाई सोनवणे
अनु. जाती गट: गणेश ठाकरे
इमाव गट: काळू दौलत पाटील
शेतकरी विकास पॅनल
सोसायटी सर्वसाधारण गट
किशोर जगन्नाथ खैरनार
प्रमोद वसंतराव बिरारी
डॉ. राहुल वसंतराव सोनवणे
महिला राखीव: सुरेखा आहिरे
ग्रा. प. सर्वसाधारण गट: विनोद आहिरे, हरिभाऊ जाधव
व्यापारी गटातून विजयी
योगेश रौदळ
दिपक सोनवणे
हमाल मापारी गटातून विजयी
संदीप साळे (दुसऱ्यांदा विजय)
या प्रमुख नेत्यांचा पराभव
या निवडणुकीत मविप्रचे माजी सभापती व भाजपाचे डॉ. विलास बच्छाव, बाजार समितीचे माजी सभापती नानाजी दळवी सटाण्याचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांचा मोठा पराभव झाला. तसेच, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राघो आहिरे यांच्या आव्हानालाही मतदारांनी सपशेल नाकारले.
बाजार समितीवर एकहाती सत्ता आणणाऱ्या संजय सोनवणे यांनी परत एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयामुळे पश्चिम भागातील राजकारणाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. सटाणा तालुक्यातील राजकीय समीकरणे या निवडणुकीमुळे बदलली असून आगामी काळात याचे परिणाम दिसून येतील.