सटाणा – भारतीय सैन्य दलात चार वर्षापासून कार्यरत असलेले तालुक्यातील भाक्षी येथील जवान स्वप्नील ऊर्फ सोपान रौंदळ जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते राहत असलेल्या रुमला लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला आहे.
तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवान स्वप्निल रौंदळ यांचे सैन्य दलाच्या उधमपूर सेक्टर येथे ट्रेनिंग सुरू होते. ते ज्या रूममध्ये वास्तव्यास होते त्या रूमला शॉर्टसर्कीटने आग लागल्याने स्वप्नील रौदळ यांच्यासह अन्य तीन जवानांचा आगीत होरपळून मूत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
जवान स्वप्नील रौंदळ यांचे पार्थिव भाक्षी येथे अंतिम संस्कारासाठी कधी येईल याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. जवान स्वप्निल रौंदळ हे अविवाहित असुन त्यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, व एक भाऊ असा परिवार आहे.