सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे विविध हिंदू संघटना एकत्रित येत पोलीस स्थानका पर्यंत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला. मालेगाव येथील एमएसजी महाविद्यालयात करिअर गाईडन्सच्या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणाचे धडे देऊन धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याचा आरोप झाल्यानंतर बराच गदारोळ होऊन अखेर पोलिसांनी आयोजक, प्राचार्य यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल केले.
या प्रकरणी सटाणा येथील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असताना सुद्धा हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.