मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सटाणा – कार विहिरीत पडल्याने चार जणांचा मृत्यू, तर एक जण सुखरुप बचावले

by India Darpan
मे 7, 2021 | 6:05 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210507 WA0019

सटाणा-  लग्‍नासाठी कारने जात असतांना साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील दिघावे फाट्या जवळ असलेल्या विहिरी कार पडल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्‍यू  झाला. तर तर एक जण सुखरुप बचावले. सटाणा येथील रहिवाशी शंकर यादवराव बोडखे हे स्वमालकीच्या कार (क्र. एमएच ०२, १७४०) मधून जात असतांना हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार दिघावे फाट्यावरील कासारेचे शेतमालक मिलिंद जयवंतराव देसले यांच्या विहिरीत पडली.
या अपघातात कार चालवत असणारे शंकर बोडखे (रा. सटाणा) हे कारमधून सुखरूप बाहेर पडले. परंतु त्यांची पत्नी गौरी बोडखे, (वय ३५), मुलगी श्रद्धा (वय १५), मुलगा तन्मय (वय १२) व दिघावे येथील नात्‍यातील युवती भूमिका योगेश पानपाटील (वय १२) हे पाण्यातच मृत झाले. कार चालवत असलेले शंकर बोडखे घडलेल्‍या प्रसंगाने इतके घाबरले होते, की त्यांना एक तास काहीच सुचले नाही, एका ठिकाणी बसून केवळ ते पाहत राहिले.
गाव धावले मदतीला
कासारे येथे घटना कळताच सरपंच विशाल देसले, पोलीस पाटील दिपक काकूस्ते, मनसेचे धिरज देसले, ग्रामपंचायत सदस्य बाळा खैरनार, जितेंद्र देसले यासह तरुण तात्काळ मदतीसाठी धावले. मदतकार्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करत अवघ्‍या काही वेळातच मदतकार्य केल्यामुळे शंकर बोरसे यांना वाचविण्यात यश आले. इतर कुटुंबीय मात्र मृत झाले. साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने विहिरीतून तरुणांच्या मदतीने कार बाहेर काढली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरु होता. विहिरीतून मृत व्यक्तींची प्रेते काढण्याचे काम चालू होते.
बोडखेचे वेल्डिंग वर्कशाॅप
सटाणा शहरात शंकर बोडेखे यांचे वेल्डींग वर्कशॅाप आहे. या अपघातात चार जण दगावल्याचे वृत्त सायंकाळी सटाणा येथे कळाले. ते राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयमाचा पुढाकाराने प्रशासनाला देणार १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

Next Post

आजचे राशिभविष्य – शनिवार – ८ मे २०२१

India Darpan

Next Post

आजचे राशिभविष्य - शनिवार - ८ मे २०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011