निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्न डांगसौंदाणे उपबाजार समितीचा शेतमाल खरेदी शुभारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर होत आहे. तशी माहिती बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे व संचालक संजय सोनवणे यांनी दिली आहे.
गत अनेक वर्ष मागणी असलेली डांगसौंदाणे उपबाजार समितीची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. या भागातील शेतमाल विक्री सुलभ व्हावी शेतकऱ्यांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक श्री संजय सोनवणे यांनी या उपबाजार समितीसाठी पाठपुरावा करीत उपबाजार समितीला मंजुरी मिळविली होती. डांगसौंदाणे उपबाजार समितीसाठी सटाणा बाजार समितीने शासनाकडून जागा खरेदी करीत हे उपबाजारावर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करीत आहे.
बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी याबाबत माहिती दिली असून सध्या मका खरेदी चा शुभारंभ करण्यात येणार आहे जे शेतकरी या उपबाजार समितीमध्ये माल विक्री आणतील त्यांना व्यापाऱ्यांकडून रोखीने पैसे दिले जातील अशी माहिती सचिव तांबे यांनी दिली आहे. बागलांणच्या पश्चिम भागातील प्रमुख व्यापारी पेठेचे गाव असलेले डांगसौंदाने येथे उपबाजार निर्मिती करण्यात यावी यासाठी दहा ते पंधरा वर्षे स्थानिक पुढाऱ्यांचा प्रयत्न सुरू होता. थेट शेतकऱ्यांमधून निवडून आलेले संचालक मंडळाच्या काळात सदर उपबाजार समितीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर या भागातील शेतकऱ्यांची लांब येण्या जाण्याची शेतमाल विक्रीसाठी होत असलेली गैरसोय ही आता या उप बाजार समितीमुळे थांबणार असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे व सभापती पंकज ठाकरे यांनी दिली आहे. या उपबाजर समिती मध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आवहान संचालक मंडळाने केले आहे.
Satana Dangsaundane apmc Auction start