सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालु्क्यातील डांगसौंदाणे येथील गोसावी चौकातील मोटार रिवाईंडिंग आणि दुरुस्तीच्या दुकानातून सुमारे १०० किलो तांब्याच्या तारेची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे. या घटनेची सटाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
येथील रतीलाल गांगुर्डे यांच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या मोटारींमधून काढलेली तांब्याची तार त्यांनी साठवून ठेवली होती. हे तांबे साधारण ७०० रुपये प्रति किलो दराने विकले जाते. गांगुर्डे यांनी अधिकचे पैसे मिळावेत म्हणून वर्षभर या तारेची जपणूक केली होती. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला आणि तांब्याची तार चोरी केली. शनिवारी सकाळी गांगुर्डे दुकानात आल्यावर ही चोरी उघडकीस आली.
या घटनेनंतर सटाणा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. योगेश शेवाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी व्यापारी आणि लोकप्रतिनिधींची सोमवार, १९ रोजी बैठक बोलावली आहे.