सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील लखमापूर-निंबोळा मार्गावरील गिरणा नदीच्या पुलावर एका अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेने मालवाहू अॅपेरिक्षा थेट पुलावरुन नदीत कोसळली. या अपघातात दोघे पिता-पुत्र जखमी झाले असून त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान या पुलाला कठडे नसल्याने ही मालवाहू अँपे रिक्षा नदीत पडल्याच बोलले जात आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने पुलावर कठडे बांधावे अशी मागणी केली आहे.