निलेश गौतम, सटाणा
मागणी अभावी केळझर(गोपाळ सागर) धरणाचे तिसरे आणि शेवटचे आवर्तन रखडल्याने नदी काठावरील काही गावांना उन्हाळ्याच्या अखेरीस पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एरवी 15 मे च्या दरम्यान सुटणारे पाण्याचे तिसरे आवर्तन 30 मे नंतर ही न सुटल्याने सध्या नदीकाठावरील काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
या पाण्यावर सटाणा शहरासह नदीकाठावरील 30 ते 35 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते मात्र या वर्षी अवकाळी व गारपीट ने शेतीची ही अवस्था खराब झाली असल्याने शेतीपंपाचे पाणी उपसा बहुतांश प्रमाणात कमी झाला आहे यामुळे धरणाच्या पश्चिमेकडील भागात आरम नदी पात्र काही अंशी प्रवाहित आहे. मात्र आता मान्सून चे आगमन होण्याची वेळ आली तरी अजुन पाण्याचे आवर्तन सोडण्यात विलंब झाला आहे.
जलसंपदा विभागाला या आवर्तनाची आठवण पडली की जनतेची मागणी नाही असाच काहीसा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असुन की सटाणा शहराला सद्यस्थितीत पाणी टंचाई जाणवत नाही? सद्या स्थितीत धरणात 120 द.ल.घ फु इतके पाणी शिल्लक आहे. दरवर्षी सोडण्यात येणारे 90 द.ल.घ.फू. पाणी आवर्तन नेमके आरम नदीपात्रात केव्हा सोडले जाणार की, आहे तो पाणी साठा जैसे थे ठेवणार याचीच चर्चा आता परिसरातील जनतेमधून होत आहे.
केळझर (गोपाळ सागर) धरणातून आरम नदी पात्रात पाणी सोडण्याचे अधिकार हे मा. जिल्हाधिकारी यांचे आहेत. परिसरातील ग्रामपंचायती, व सटाणा नगरपरिषदेच्या मागणी नुसार मा. जिल्हाधिकरी नाशिक यांच्या आदेशानुसार पाणी सोडण्यात येईल
– अभिजित रौदळ, अभियंता, जलसंपदा, सटाणा
Satana 35 Villages Water Scarcity