सटाणा – तालुक्यातील उत्राने येथील शासकीय लस देण्याचे काम येथील मराठी शाळेत देण्याचे ठरले असताना ग्रामपंचायत विभागाने २ दिवसांपूर्वी जनजागृती करून लस घेण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिकांना केले होते. मात्र आज आरोग्य कर्मचारी येऊन लसीकरण सुरू झाले मात्र ३ ते ४ नागरीनकांची ऑनलाईन नावनोंदणी झाली असताना तेथे त्यांनतर नावनोंदणी वेबसाईट बंद पडली. त्यामुळे वयोवृद्ध लोक ताटकळत बसले. त्यांनतर आरोग्य कर्मचारी यांना रयत क्रांती संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक पगार यांनी व ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना एका खोलीत डांबून ठेवले.
यावेळी आरोग्य विभागाने असे जनतेला दिशाभूल करण्याचे काम त्वरित बंद करावे व तात्काळ लसीकरण सुरू करावे अन्यथा आरोग्य कर्मचारी यांना आम्ही सोडणार नाही. आरोग्य विभागाने हा खोडसाळपणा बंद करावा अन्यथा या परिस्थितीत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल अशा इशाराही यावेळी देण्यात आला. पण, त्यानंतर वेबसाईटही सुरु झाली व काही वेळाने लसीकरण सुरळीत झाले व वृध्दांनी सुस्कारा सोडला.
त्यानंतर ग्रामस्थांची कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानले. ग्रामपंचायत उत्राण्याचे सरपंच केदा पगार, उप सरपंच पुंजाराम पगार,सदस्य योगिता मधुकर पगार,अनुसया पगार,जेलाबाई बागुल,कोमल पगार,नितीन पगार,रोहिदास आहिरे व सर्व जेष्ठ ग्रामस्थ उपस्थितीत होते.