नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेची सन – २०२२ ते २०२७ ची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे. मतदान करण्यासाठी पात्र मतदार म्हणून दि. ३१ मार्च,२०२२ अखेर पावेतोची मासिक सभासदांची वार्षिक वर्गणी भरणे आवश्यक आहे. घटनेच्या तरतूदीनुसार ज्या सभासदांची वर्गणी बाकी किंवा थकीत आहे अश्या सभासदांनी त्यांची वर्गणी दि. ७ मार्च, २०२२ पर्यंत संध्याकाळी ७.३० वा. पावेतो सावानाच्या कार्यालयात भरणा करावी व पावती घ्यावी. ज्या सभासदांची थकीत वर्गणी दि. ७ मार्च, २०२२ पर्यंत भरलेली असेल त्यांचीच नावे मतदान यादीत घेतली जातील. सावानाच्या घटनेनुसार प्रारूप मतदार यादी किंवा अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करता येतील, यांची सभासदांनी नोंद घ्यावी. असे आवाहन वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहा.सचिव प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, अर्थसचिव उदयकुमार मुंगी व कार्यकारी मंडळाने केले आहे.