नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओबीसी सुवर्णकार समिती नाशिक व सर्व शाखिय सुवर्णकार यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत वधू – वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवारी (दि.१२) सकाळी १० ते सायं. ६ वा. राजयोग मंगल कार्यालय, मीनाताई ठाकरे स्टेडियम जवळ, के.के. वाघ कॉलेज, आडगांव नाका येथे होणार आहे. कशी माहिती आयोजक गजू घोडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. यामध्ये सर्व सुवर्णकार समाजातील सर्व जाती, पोटजातीचा या विवाह मेळाव्यात समावेश करण्यात आला आहे. मेळावा मोफत आहे . मेळाव्याला येताना येताना प्रत्येकाने आपला बायोडाटा व फोटो लावून आणायचा आहे. अधिक माहितीसाठी ९८२२७८८९३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक गजू घोडके यांनी केले आहे.