नाशिक – महाराष्ट्र शासना ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीटलाइटचे विजदेयके भरणा पूर्वीप्रमाणेच जिल्हापरिषदेमार्फत महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागच भरणार असा शासननिर्णय जारी करण्यात आल्यामुळे अ. भा.सरपंच परिषदेच्या वतीने फटाके फोडून विजयउत्सव साजरा करण्यात आला. तसेच ज्यांच्यावर विजवितरण कंपनीने गुन्हे दाखल केले होते. त्या सरपंचांचा खा.हेमंत गोडसे,आ.सरोज अहिरे,मा.आ.योगेश घोलप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी खा.गोडसेंनी सरपंच परिषदेच्या एकजुटीचे कौतुक केले व यापुढे ही एकजुट कायम ठेवून ग्रामविकास साध्य करावा अशा शुभेच्छा दिल्या. तसेच आ.अहिरेंनी ग्रामपंचायतीचे प्रलंबित प्रश्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. माजी आ.घोलप यांनी सुद्धा सरपंचाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच अ. भा.सरपंच परिषदेचे जिल्हाअध्यक्ष तानाजी गायकर यांनी यांनी सरपंच एकजुटीचे अभिनंदन केले व ही एकजूट भविष्यातही अशीच कायम ठेवावी असे आवाहन केले.
गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटचे विज बिल हे शासनच भरत होते. परंतु, मागील तीन ते चार वर्षापासून ही देयके शासनाकडून महावितरणला वर्ग करण्यात न आल्याने महावितरण कंपनीने ग्रामपंचायतींच्या नावे मोठ्या प्रमाणात थकीत विजबिले बजावण्यात आले. तसेच मागील दोन महिन्यापूर्वी अचानक शासनाच्या वित्त विभागाने परिपत्रक जारी केले की यापुढे ही विजबिल देयके ग्रामपंचायतीने महावितरणला भरावीत. या कारणाने महावितरणने ग्रामपंचायतीकडे विज बिल मागणी केली असता सर्व ग्रामपंचायतींनी यास विरोध केला. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये महावितरणने ग्रामपंचायतींचा पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आणि गावाच्या गावे अंधारात गेली. त्यामुळे अ. भा.सरपंच परिषदेच्या वतीने नाशिक मधील विद्युत भवन येथे निवेदन देण्यात आले की सणासुदीच्या दिवसांमध्ये तरी ग्रामपंचायतींचा पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा जेणेकरून गावकऱ्यांना सणासुदीच्या दिवसांमध्ये अंधारात राहण्याची वेळ येणार नाही. परंतु तेथील अधिकाऱ्यांनी त्यास कुठलाही प्रतिसाद दिला नाही व वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे सरपंच परिषदेच्या वतीने नाशिक मध्ये विद्युत भवन समोर एकदिवसीय उपोषण करण्याचे ठरले आणि शेवटी सर्व ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उपोषणाला बसले. तरीही महावितरणच्या अधिकार्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून शेवटी अ. भा.सरपंच परिषदेच्या सर्व सरपंचांनी आक्रमक पवित्रा घेत खा.हेमंत गोडसे व माजी आ.योगेश घोलप यांच्या उपस्थितीत नाशिकमधील विद्युत भवनाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यामुळे सरपंच परिषदेच्या नाशिक मधील बऱ्याच सरपंचावर गुन्हे दाखल झाले. हे बघून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरपंच परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली तसेच हे आंदोलन करण्यात आले या सर्वांची दखल घेऊन शेवटी महाराष्ट्र शासना ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीटलाइटचे विजदेयके भरणा पूर्वीप्रमाणेच जिल्हापरिषदेमार्फत महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागच भरणार असा शासननिर्णय जारी करण्यात आल्यामुळे अ. भा.सरपंच परिषदेच्या वतीने फटाके फोडून विजयउत्सव साजरा करण्यात आला.
अ. भा.सरपंच परिषदेचे जिल्हाअध्यक्ष तानाजी गायकर यांनी यांनी सरपंच एकजुटीचे अभिनंदन केले व ही एकजूट भविष्यातही अशीच कायम ठेवावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाला नाशिक तालुक्यातील सरपंचपरिषद पदाधिकारी महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिल ढिकले,दत्तू ढगे,सदानंद नवले,नवनाथ गायधनी,त्रंबक पगार,भाऊसाहेब झोबाड,राजाभाऊ सहाणे,आत्माराम दाते, ऍड.अरुण खांडबहाले,ऍड.गोकुळ आत्माराम दाते रमेश कहांडळ पिंगळे,रमेश खांडबहाले,सचिन जगताप, राजू धात्रक,भास्कर कराड,किशोर बागुल,शेखर गोडसे,भास्कर थोरात, अंबादास ढिकले ,मधुकर ढिकले ,अरुण अनवट , राजू धात्रक ,ज्ञानेश्वर अनवट, दीपक हगवणे, विकास जाधव, भाऊसाहेब म्हैसधुने, सुनील कडाळे, पवन कहांडळ, विजय रिकामे ,राहुल पाटील, सुभाष पारधी, सुभाष कसबे, नवसु फसाळे ,माधव गायधनी, काळू आडके, युवराज जगळे, प्रदीप मोहिते, अनिता रिकामे, अलका झोंबाड, पुष्पा ढिकले, सुरेखा गायधनी, अलका दिवे शैला ठुबे, सुनंदा पेखळे, रेखा कडाळे आदी सरपंच,उपसरपंच, व सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार सागर जाधव यांनी मानले.