नाशिक – सारेगमप लिटिल चॅम्पच्या नव्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यात नाशिकच्या डॅान बास्को स्कुलची राशी पंकज पगारे या विद्यार्थींनीचे गाणे सध्या प्रमोमध्ये झळकत असून ते अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. स्केटींग करत तीची झालेली दिमाखदार इंन्ट्री व तीने गायलेलेे मी आले .. हे गाणे सध्या धुम करत आहे,सारेगमप लिटिल चॅम्प्स २४ जूनपासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वा. झी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे.
राशी ही स्वामिनी फेम सृष्टी पगारे हिची मोठी बहिण आहे. तिने गाण्याच्या अनेक स्पर्धेत भाग येऊन यश मिळवले आहे. व्हायस ऑफ नाशिक २०१७, कलर टीव्हीचा सूर नवा ध्यास नवा यामध्ये २१ अंतिम स्पर्धकामंध्ये ती होती. त्याचबरोबर रेडिओ मिरचीच्या २०१७ च्या स्पर्धेत ती सुपर सिंगर ठरली आहे. एकता कल्चर अॅकेडमीच्या राज्यस्तरीय स्पर्धेतही तीने यश मिळवले आहे. गायनाबरोबर ती स्केटींगमध्ये गोल्ड मेडिलीस्ट आहे. विशेष म्हणजे तीला सहा भाषा येतात. तीचे वडील प्रा. पंकज पगारे हे गोखले एज्युकेशन इंजिनिअरींग महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तर आई अपर्णा पगारे या डाॅक्टर आहे.
छोट्या दोस्तांना आपलं टॅलेंट संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करायची संधी देणारा सारेगमप लिटिल चॅम्प असून या नवीन पर्वात ४ छोटे वादक मित्र साथ देताना दिसणार आहेत. त्यात नाशिकचा ११ वर्षांच्या जय अविनाश गांगुर्डेचा समावेश आहे. तर गायनामध्ये राशी पगारे आहे.
राशी पगारे हिच्या गाण्याचा प्रमो बघण्यासाठी या लिंकला क्लिक करा…