मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण सनी लिओनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्यावरून बराच वाद सुरु झाला होता, मात्र आता हा वाद थांबू शकतो. या गाण्यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या गाण्याला बहुतांश जणांचा विरोध आहे. अर्थात या गाण्यात सनीने अनेक डान्स मूव्ह दाखवल्या आहेत, पण मथुरेत मात्र त्याला विशेष विरोध होत आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे साधू महंतानी सनी लिओनीच्या या नवीन व्हिडिओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या गाण्यावर सनीने अश्लील डान्स केल्याचे संतोचे म्हणणे आहे. अशावेळी त्याच्यावर बंदी घालायला हवी. त्यांनी या नृत्याला अश्लील संबोधून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. मध्यप्रदेशच्या राज्य सरकारने या अभिनेत्रीवर कारवाई केली नाही आणि तिच्या व्हिडिओ अल्बमवर बंदी घातली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ असे महंत म्हणाले होते.
सनी लिओनीचे हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. त्यानंतर हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, मात्र अनेकांनी तिला यावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्याच्या बोलाबाबत काही जणांचे म्हणणे आहे की, यात सनी ज्या पद्धतीने नाचत आहे आणि या गाण्याच्या बोलानुसार ती अत्यंत आक्षेपार्ह आहे, त्यामुळे राधा आमच्यासाठी पूजनीय आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या वादावर भाष्य केले की, सारेगामा या म्युझिक लेबलने एक सोशल मीडिया पोस्ट केली असून गाण्याचे बोल बदलले जातील आणि नवीन गाणे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जाईल असे म्हटले आहे, तसेच मिश्रा यांनी सांगितले की, बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री सनी लिओन आणि साकिब तोशी यांनी त्यांचे वादग्रस्त गाणे ‘मधुबन में राधिका नाचे’ सोशल मीडियावरून तीन दिवसांत न हटवल्याबद्दल माफी मागितली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
https://twitter.com/saregamaglobal/status/1475064073330958341?s=20
तसेच काही दिवसांपूर्वी सारेगामा या म्युझिक लेबलने सोशल मीडियावर या गाण्याच्या वादाबद्दल अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. सारेगामाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या देशवासियांच्या अलीकडच्या प्रतिक्रिया आणि भावनांचा आदर करत आम्ही मधुबन गाण्याचे नाव आणि बोल बदलू. नवीन गाणे पुढील ३ दिवसात सर्व प्लॅटफॉर्मवर जुन्या गाण्याची जागा घेईल.