नाशिक – सिंग इंजिनिअरींग या उद्योगसमुहाचे संस्थापक तसेच गुरू गोबिंदसिंग फाउंडेशनचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष सरदार गुरदेव सिंग बिर्दी (वय ८९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
गेल्या ४ दशकांपासून ते संस्थेत कार्यरत होते. तसेच गेल्या ३१ वर्षांपासून ते अध्यक्षपदी कार्यरत होते. गुरूगोबिदसिंग पब्लिक स्कुल, ज्युनिअर कॉलेज तसेच तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. ९ विद्यार्थ्यांपासून सुरूवात झालेल्या या गुरू गोबिंद सिंग फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थेत आता सुमारे ७ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.
सिंग इंजिनिअरींग या उद्योगसमुहात तयार होणार्या विविध मशिनरींज या भारतातच नव्हे तर परदेशात ही निर्यात होतात. तसेच सातपूर येथील औद्योगिक वसाहत स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार तसेच विविध संस्थाच्या वतीने विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात २ मुले कुलजितसिंग आणि प्रितपालसिंग, मुलगी कुलदीपकौर सौंद, सुना व नातवंडे- गुरूमितसिंग, जगपालसिंग, रणजितसिंग, परविंदरसिंग असा परिवार आहे.